ठाणे एसटी डेपोत होर्डिंग पडलं, वाहतूक कोंडीने प्रवासी त्रस्त

ठाणे एसटी डेपोत होर्डिंग पडलं, वाहतूक कोंडीने प्रवासी त्रस्त

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हे होर्डिंग पडलं असा आरोप होतोय. याच बसस्थानक परिसरात अनेक मोठ मोठे जाहीरातीचे होर्डिंग्स लावलेले आहेत.

  • Share this:

ठाणे,13 जून : ठाणे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एसटी स्थानकात आज मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. स्थानकाच्या इमारतीवर जाहीरातीसाठी लावलेलं एक प्रचंड मोठं होर्डिंग आज हवेमुळं खाली कोसळलं. सुदैवानं तिथे प्रवासी किंवा बस नसल्याने मोठी हानी टळली. गेल्या दोन दिवसांपासून वेगाने वारे वाहत असल्याने हे होर्डिंग कोसळलं. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीही झाली. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.दरररोज लाखो प्रवाशांची ये जा असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला एस.टी.चं हे स्थानक आहे. या स्थानकातूनही दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. बोरीवली, भाईंदर, नालासोपारा, वसई, भिवंडी अशा मार्गावर या स्थानाकातून गाड्या जातात आणि त्याला प्रचंड गर्दी असते. या गाड्या खच्चून भरलेल्या असतात त्यामुळे या ठिकाणी एखादी बस उभी असती तर मोठी हानी झाली असती.

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हे होर्डिंग पडलं असा आरोप होतोय. याच बसस्थानक परिसरात अनेक मोठ मोठे जाहीरातीचे होर्डिंग्स लावलेले आहेत. जाहीरातदार कपंन्या अतिशय कमी पैशांमध्ये हे होर्डिंग लावतात. कंत्राटदारही तकलादू काम करतात असाही आरोप होतोय. पावसाळ्यात कायम अशा घटना घडत असतात. त्यामुळे अशा लोकांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात येतेय.

मुंबईतही कोसळलं होतं होर्डिंग

'वायू' चक्रीवादळामुळे मुंबई आणि गुजरातच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. या वाऱ्यामुळे मुंबईत चर्चगेट स्टेशनवरचं होर्डिंगही बुधवारी कोसळलं होतं. यात 62 वर्षांच्या मधुकर नार्वेकर यांचा मृत्यू ओढवला आहे.

मुंबईत जोरदार वारे आणि पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. त्यातच मुंबईकरांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वादळ गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकलं असलं तरी मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: thane
First Published: Jun 13, 2019 03:09 PM IST

ताज्या बातम्या