शेतकऱ्यांकडून उकळले जात होते MRP पेक्षा जास्त पैसे, अशी झाली कारवाई

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्याने पै-पै गोळा करुन पेरणीसाठी जमवलेल्या पुंजीवर दुकानदार डल्ला मारत असल्याचे समोर आले आहे.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 09:27 PM IST

शेतकऱ्यांकडून उकळले जात होते MRP पेक्षा जास्त पैसे, अशी झाली कारवाई

बीड, 27 जून- दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्याने पै-पै गोळा करुन पेरणीसाठी जमवलेल्या पुंजीवर दुकानदार डल्ला मारत असल्याचे समोर आले आहे. बीड तालुक्यातील नेकनूर येथे बोगस बियाणे आणि चढ्या दराने खत आणि बियाणे विक्री करणाऱ्या दुकानांवर कृषी विभागाने धाड टाकली. या धाडीत जुन्या खताचा 23.25 टन स्टॉक आढळून आला आहे. या जुन्या खताची शेतकऱ्याला चढ्या भावाने विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे. अशाच पद्धतीने बीड जिल्ह्यत बऱ्याच दुकानात सर्रास राजरोस विक्री केल जात असल्याचे समोर आले आहे.

बीड तालुक्यातील आंबील वडगाव चे शेतकरी गणेश जाधव हे नेकनूर येथील कृष्णा कृषी सेवा केंद्रावर खत खरेदीसाठी गेले असता 8 बॅगची सरदार या 50 किलो खताची किंमत-एमआरपीप्रमाणे 813 रुपये आहे. मात्र, दुकानदार 1065 रुपयाने पावती देऊन विक्री केली जात आली. यावेळी गणेश जाधव यांनी विचारना केली असता भाव हाच आहे, घ्यायची तर घ्या, नाहीतर बाहेर निघा, असे उद्धट उत्तर दिले. शेवटी जाधव यांनी तालुका कृषी विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेऊन कृषी अधिकाऱ्यांनी धाड टाकली. या कारवाईत 23.25 टन जुने खत आढळून आले. त्याचबरोबर इतर खते देखील बेकायदेशीररीत्या साठवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे या दुकानांवर खत जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

प्रो प्रा.मंत्री यांच्या कृष्णा कृषी सेवा केंद्र नेकनूर येथे हा स्टॉक आढळल्यामुळे तालुका कृषी अधिकारी आणि निरीक्षक वजनी मापे कार्यालयाची संयुक्त कारवाई करण्यात आली. यामुळे कृषी दुकानांदाराचे धाबे दणाणले आहे. अशी विक्री करत असेल तर त्याची तक्रार केली तर कारवाई केली जाईल. चढ्या दराने खत विक्री करणे बेकायदा आहे, असे तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी सांगितले आहे.

VIDEO:आजचा दिवस हा मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस- संभाजी राजे

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-386139" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/Mzg2MTM5/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2019 09:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...