अमरावतीमध्ये वाळू तस्करांविरोधात कारवाई; 2 कोटी रुपयांची रेती आणि तब्बल 93 ट्रक जप्त

अमरावतीमध्ये वाळू तस्करांविरोधात राज्यातली सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 2 कोटी रुपयांची रेती आणि तब्बल 93 ट्रक जप्त करण्यात आले आहेत.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Feb 23, 2018 08:24 AM IST

अमरावतीमध्ये वाळू तस्करांविरोधात कारवाई; 2 कोटी रुपयांची रेती आणि तब्बल 93 ट्रक जप्त

23 फेब्रुवारी : अमरावतीमध्ये वाळू तस्करांविरोधात राज्यातली सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 2 कोटी रुपयांची रेती आणि तब्बल 93 ट्रक जप्त करण्यात आले आहेत. धामणगाव तालुक्यातील बोरगाव धांदे रेती घाट आणि बाभूळगाव तालुक्यात येणाऱ्या सौजना रेती घाटावर होत असलेल्या अवैध रेती तस्करीला पोलिसांच्या विशेष पथकाने लगाम लगावला आहे.

कोट्यवधींचा महसूल बुडवणाऱ्या रेतिमाफियांना पोलिसांनी दणका दिला आहे. महसूल विभागातील ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोललं जात असून अमरावती पोलीस विभागाच्या विशेष पथकातील परिक्षाविधीन आयपीएस अधिकारी समीर शेख यांच्या नेतृत्वात झालेल्या या कारवाईने रेतीतस्करांचे धाबे दणाणले आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2018 08:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...