अमरावीत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला

15 वर्षीय पीडित विद्यार्थिनी व तिची मैत्रीण शाळा सुटल्यानंतर मालटेकडी जवळील वसंत हॉल येथून सायकल घेऊन पायी जात असताना 3 युवक पल्सरने आले व त्यांनी या विद्यार्थिनींवर अॅसिड फेकले व फरार झाले .

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 6, 2017 10:25 AM IST

अमरावीत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला

06 डिसेंबर: अमरावतीत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अॅसिडफेक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन तरुणांनी केलेल्या अॅसिड हल्ल्यात विद्यार्थिनी 12 टक्के भाजली आहे.

मंगळवारी संध्याकाळी अमरावतीच्या मालटेकडी परिसरात ही घटना घडली. एकतर्फी प्रेमातून आरोपींनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. पीडित विद्यार्थिनी सिद्धार्थनगर भागात राहते. संबंधित विद्यार्थिनी अमरावतीतील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकते. काल संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास दोघांनी तिला गाठून अॅसिड फेकलं. या हल्ल्यात ती 12 टक्के भाजली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अमरावती शहरातील गजबजलेल्या मालटेकडी परिसरात काल  सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एका माथेफिरुने एका ९ व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अॅसिडने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याची बाब पून्हा एकदा सिद्ध झाली आहे. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती .

15 वर्षीय पीडित विद्यार्थिनी व तिची मैत्रीण शाळा सुटल्यानंतर मालटेकडी जवळील वसंत हॉल येथून सायकल घेऊन पायी जात असताना 3 युवक पल्सरने आले व त्यांनी या विद्यार्थिनींवर अॅसिड फेकले व फरार झाले . या विद्यार्थिनीला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोपीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिस तपास करीत असून या प्रकरणी 2 युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे,1 अध्यापही फरार आहे,एकतर्फी प्रेमातून हा ऍसिड हल्ला झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2017 10:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...