बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला 12 हजारांचा दंड आणि बकऱ्याच्या मटनाचे गावजेवण!

बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला 12 हजारांचा दंड आणि बकऱ्याच्या मटनाचे गावजेवण!

धानोरा तालुक्यातल्या एका गावात ही धक्कादायक आणि चीड आणणारी घटना घडली आहे.

  • Share this:

04 फेब्रुवारी : गडचिरोलीत एका बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला सोडण्यासाठी 12 हजार रुपयांचा दंड आणि बकऱ्याचं जेवण अशी मांडवली जात पंचायतीनं केली आहे. धानोरा तालुक्यातल्या एका गावात ही धक्कादायक आणि चीड आणणारी घटना घडली आहे.

पाचव्या वर्गात शिकत असलेल्या मुलीला आरोपी अनिल मडावी याने १७ जानेवारी रोजी तिच्या आईला बरे वाटत नसल्याचे सांगून शिक्षकांची परवानगी घेवून शाळेतून नेले. यानंतर गावतलावाकडे नेवून तिच्यावर अत्याचार केला. यामुळे पिडीत मुलगी गंभीर जखमी झाली. यानंतर १८ जानेवारी रोजी मोहली येथे जातपंचायत बोलाविण्यात आली. यामध्ये सरपंचा गावडे, उपसरपंच बागु पदा, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष रोहिदास पदा तसेच माडीया गोंड समाजातील इतर नागरिक उपस्थित होते. जातपंचायतीच्या निर्णयानुसार आरोपी अनिल मडावी याला १२ हजार रूपये दंड व गावाला बकऱ्याचे जेवन देण्याची शिक्षा सुनावली.

या शिक्षेनुसार आरोपीनं गावजेवन दिले. मात्र पिडीतेच्या कुटुंबीयांना दंडाची रक्कम दिली नाही. पिडीत मुलीची प्रकृती अधिक गंभीर झाल्यानंतर पिडीतेच्या कुटुंबीयांनी जातपंचायतीचा सल्ला घेतला. मात्र जातपंचायतीकडून कोणतीही मदत न मिळाल्याने पोलिस पाटील नंदा नलचुलवार यांच्याशी संपर्क साधून धानोरा पोलिस ठाण्यात २४ जानेवारी रोजी आरोपी अनिल मडावी विरूध्द तक्रार दाखल केली.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला व आरोपीस अटक केली. मात्र यामध्ये जातपंचायतीचा कुठेही उल्लेख करण्यात आला नाही. या प्रकरणी जात पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भूमकाल संघटनेकडून करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 4, 2018 10:33 AM IST

ताज्या बातम्या