S M L

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अहवालानुसार बिबट्यांच्या संख्येत वाढ!

बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपिंग परीक्षणात बिबट्यांची संख्या वाढली असल्याचं आढळून आलं आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Feb 7, 2018 08:57 AM IST

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अहवालानुसार बिबट्यांच्या संख्येत वाढ!

07 फेब्रुवारी : बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपिंग परीक्षणात बिबट्यांची संख्या वाढली असल्याचं आढळून आलं आहे. असा अहवाल मंगळवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सादर करण्यात आला. या अहवालानुसार, २0१५ साली कॅमेरा ट्रॅपिंग परीक्षणात ३५ बिबटे आढळून आले होते. तर २0१७ साली करण्यात आलेल्या परीक्षणात बिबट्यांची संख्या ४१ नोंदविण्यात आली आहे. ४१ बिबट्यांमध्ये १५ नर आणि २३ मादींचा समावेश असून, २७ बिबटे पहिल्यांदाच छायाचित्रात दिसून आले आहेत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह आसपासच्या आरे मिल्क कॉलनी, आयआयटी-पवई, घोडबंदर गाव, नागला ब्लॉक या परिसराची निवड अभ्यासासाठी करण्यात आली होती. या वेळी जवळपास १४0 किलोमीटर क्षेत्रात अभ्यास करण्यात आला.

कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये २ भाग करण्यात आले होते. त्यात पहिल्या भागात २४ कॅमेरा ट्रॅप आणि दुसर्‍या भागात २५ कॅमेरा ट्रॅप करण्यात आले होते. दोन्ही जागेवर २२ दिवस कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे परीक्षण सुरू होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2018 08:57 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close