मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

इनोव्हा कारची मोटारसायकलला धडक, हालोली जवळील घटना

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2018 03:56 PM IST

मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

मुंबई, ता. ८ जुलै : मुंबई - अहमदाबाद हायवेवर हालोली गावाजवळ रविवारी सकाळी एका इनोव्हा कारने मोटारसायकलला जबर धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, मोटारसायकलवर स्वार असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झालाय.

ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनू श्रेष्ठ- संभाजी भिडे

इनोव्हा कार अहमदाबादकडून मुंबईच्या दिशेने येत होती. भरधाव असलेल्या कारचालकाने हालोली या गावाजवळ एका मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलवर स्वार असलेल्या तिघांचा जागीच मृत्यु झाला.

धक्कादायक: आता गाड्यांना धक्का मारण्यासाठी घेतले जातायेत पैसे

मृतांमध्ये निखील काशिनाथ मेधवलेश (वय 28), निखीलची आई कामिनी काशिनाथ मेधवले (वय 55) दोघेही रा. दामखींड आणी निखीलचा भाचा पुर्मय पाटिल (वय 18) रा. गोवाडे या तीघांचा मृत्यु झालाय. मनोर पोलिसांनी इनोव्हा कार चालकास ताब्यात घेतले असून, मृत पावलेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2018 03:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close