नॅशनल हायवेवर भीषण अपघात, 12 प्रवाशांसह चालक जागीच ठार

नॅशनल हायवेवर भीषण अपघात, 12 प्रवाशांसह चालक जागीच ठार

सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 4 चाकी वाहनातील 12 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे

  • Share this:

अमोल गवांडे, प्रतिनिधी

बुलढाणा, 20 मे : बुलढाण्याच्या मलरापूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 12 जण जागीच ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मलकापूर नॅशनल हायवे 6 वर असलेल्या एका कारखान्यासमोर ट्रक आणि टाटा मॅजिकचा भीषण अपघात झाला आहे.

सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 4 चाकी वाहनातील 12 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. गाडीमध्ये 12 प्रवासी होते. खरंतर चारचाकी असल्यामुळे 12 प्रवाशांची जागा नव्हती. पण जबरदस्तीने प्रवासी गाडीत बसवण्यात आले होते अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. या अपघातामध्ये 12 प्रवाशांसह चालकाचाही मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हायवे मार्गावर अपघात झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रस्त्याच्यामध्ये असलेली अपघाती वाहनं बाजुला करण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.

या अपघातामुळे स्थानिकांनी एकच गर्दी केली आहे. तर पोलीस आता गर्दी हटवण्याचं काम करत आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना तात्काळ नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून  मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर पोलीस मृतांची ओळख पटवण्याचं काम करत आहेत. नेमका अपघात कसा झाला याचा पोलीस तापस करत असून यात प्रत्यक्षदर्शींची चौकशी करण्यात येणार आहे.

EXCLUSIVE: 'नवनीत राणा नही आँधी हैं, दूसरी इंदिरा गांधी हैं...' पाहा UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 03:30 PM IST

ताज्या बातम्या