News18 Lokmat

आईच्या अंत्यसंस्काराला जाताना काळाचा घाला

आईच्या अंत्यसंस्काराला जाताना झालेल्या अपघातात 2 जण जागीच ठार झाले.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 12:43 PM IST

आईच्या अंत्यसंस्काराला जाताना काळाचा घाला

कोल्हापूर, 13 एप्रिल : नियती क्रुर असते असं म्हणतात. पण, या नियतीच्या क्रुरपणाचा प्रत्येय कोल्हापूरकरांना आला. आईचा मृत्यू झाला म्हणून गडहिंग्लज तालुक्यातील गावठाण गावातील नांदवडेकर कुटुंब आपल्या मुळ गावी चाललं होतं. कामानिमित्त नांदवडेकर कुटुंब पुणे येथे वास्तव्याला होतं. कारनं नांदवडेकर कुटुंब आईच्या अंत्यसंस्कारासाठी चाललं होतं. पण, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. काळ देखील निष्ठूर झाला होता. यावेळी कारला अपघात झाला. कार झाडावर आदळली. गडहिंग्लज तालुक्यातील हरळी गावाजवळ झालेल्या अपघातात 2 जण जागीच ठार झाले. तर, 5 जण जखमी झाले. त्यांच्यावर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.


मजुराच्या डोक्यात घुसली लोखंडी सळी आणि....


आई, मुलाचा मृत्यू

Loading...

या अपघातात काळानं नांदवडेकर कुटुंबावर घाला घातला होता. कारण, यामध्ये वासंती नांदवडेकर आणि मुलगा सोहम नांदवडेकर यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं साऱ्या जिल्ह्यातत हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय, नियती तु इतकी क्रुर का झालीस? असा हतबल सवाल देखील केला जात आहे.


VIDEO : छेड काढणाऱ्या पोलिसाला नागरिकांनी रस्त्यावरच दिला चोप, VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: accident
First Published: Apr 13, 2019 12:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...