बाप्पाच्या विसर्जनाला जाणाऱ्या बस आणि बोलेरोची टक्कर, 5 युवक जागीच ठार

बुलढाणालगतच्या मुंबई - नागपूर रस्त्यावरील ब्राम्हण चिकना गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जनांचा मृत्यू झाला आहे तर 8 जण जखमी झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2018 10:16 AM IST

बाप्पाच्या विसर्जनाला जाणाऱ्या बस आणि बोलेरोची टक्कर, 5 युवक जागीच ठार

बुलढाणा, 23 सप्टेंबर : बुलढाणालगतच्या मुंबई - नागपूर रस्त्यावरील ब्राह्मणचिकना गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून, 8 जण जखमी झाले आहेत. लक्झरी बस आणि बोलेरोमध्ये हा अपघात झाला.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामधून मुंबई- नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 183 वर रात्री ३ वाजताच्या सुमारास लक्झरी बस आणि बोलेरो गाडीमध्ये भीषण अपघात झाला. लोणार तालुक्यातील बीबी ते सुलतानपुर महामार्गावर ब्राह्मणचिकना गावाजवळ हा अपघात घडला असून यामध्ये बोलेरो गाडीतील 5  जण ठार झालेत तर 8 जण जखमी झाले. एकीकडे बाप्पाच्या विसर्जनाचा उत्साह आहे तर दुसरीकडे बुलढाण्यात या अपघातामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ब्राह्मणचिकना गावाजवळ  रात्री 3 वाजताच्या सुमारास लक्झरी बस MH 29 Av 8222 यवतमाळला जात होती तर बोलेरो पिकअप MH 37 J 1434 गाडी सिंदखेड राजाला जात होती. मात्र ब्राह्मणचिकना गावाजवळ दोघांमध्ये जोरदार टक्कर झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात घेऊन जात असतानाच मृत्यू झालाय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोलेरो पिकअप गाडीतील प्रवासी सिंदखेडराजा येथे गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी जात होते. या बोलेरो पिकअपमध्ये ढोल पथकातील युवक होते. या गाडीला अपघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच बिबी पोलीस स्टेशन पोलिसांनी आणि ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. यामुळे काही काळ वाहतुक कोंडी झाली होती.

 

Loading...

 VIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2018 10:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...