पुण्यात धावणार 'एसी' बस!

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवीणाऱ्या पीएमपीएमएलने आपल्या ताफ़यात सध्या अशा पाच वातानुकूलित बस समावेश केला आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2017 02:16 PM IST

पुण्यात धावणार 'एसी' बस!

09 जुलै: पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नागरिकांच्या सेवेत आता एसी बस दाखल झालीय. या दोन्ही शहरांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवणाऱ्या पीएमपीएमएलने आपल्या ताफ्यात सध्या अशा पाच वातानुकूलित बसचा समावेश केला आहे.

सामान्य बसपेक्षा या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या मर्यादित आहे.तिकीट दरही जास्त असल्यानं पीएमपीएमएलच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होऊ शकतो. मात्र नागरिकांनी या एसी बस सेवेला पसंती दिल्यास या बसेसची संख्या वाढविली जाणार आहे. या बसचे तिकीट दर 20 ते 60 रुपये  असणार आहेत.

पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी उचललेलं हे अाणखी एक धाडसी पाऊल मानल जातंय ,मात्र या बस सेवेला प्रथमच सुरुवात होत असूनही तुकाराम मुंढे या कार्यक्रमाला गैरहजर होते. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पदाधिकारी आणि तुकाराम मुंढे यांच्यातील मतभेद अजूनही कायम असल्याचं इथे बघायला मिळतंय .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2017 09:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...