Exit Poll 2019 : हंसराज अहिर यांची चंद्रपूरची जागा धोक्यात

भाजपचे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. एबीपी आणि नेल्सन यांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार त्यांची चंद्रपूरमधली जागा धोक्यात आहे.

News18 Lokmat | Updated On: May 20, 2019 06:35 PM IST

Exit Poll 2019 : हंसराज अहिर यांची चंद्रपूरची जागा धोक्यात

चंद्रपूर, 21 मे : चंद्रपूरमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान खासदार हंसराज अहिर यांना रिंगणात उतरवलं आहे. हंसराज अहिर हे मोदी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे सुरेश धानोरकर निवडणूक लढवत आहेत. या लढतीमुळे हंसराज अहिर यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. एबीपी आणि नेल्सन यांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार त्यांची चंद्रपूरमधली जागा धोक्यात आहे.

इथे काँग्रेसचे सुरेश धानोरकर विजयी होऊ शकतात, असा अंदाज आहे.

चंद्रपूर लोकसभेच्या जागेवर गेली 15 वर्षं भाजपचा कब्जा आहे. याआधी हा काँग्रेसचा गड मानला जात होता. त्यामुळेच काँग्रेस पुन्हा एकदा ही जागा मिळवणार की भाजप आपली जागा राखणार हा खरा प्रश्न आहे. हंसराज अहिर यांच्या नेतृत्वाखालीच भाजपने 1996 मध्ये चंद्रपूरची जागा मिळवली होती.

2014 च्या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या तुलनेत चंद्रपूरमध्ये यावेळी कमी मतदान झालं. या मतदानाचा अर्थ काय आहे ते 23 मे ला कळेल.

मागच्या निवडणुकीत भाजपचा विजय

Loading...

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांनी काँग्रेसच्या संजय देवतळेंचा पराभव केला होता. हंसराज अहिर यांना त्यावेळी 5 लाख 8 हजार 49 मतं मिळाली तर संजय देवतळे यांना 2 लाख 71 हजार 780 मतांवर समाधान मानावं लागलं होतं. या निवडणुकीत आपचे वामनराव चटप यांनाही 2 लाख 4 हजार 413 मतं मिळाली.

11 एप्रिलला मतदान

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी आणि आर्णी हे विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये वरोरा शिवसेनेकडे आहे तर उरलेल्या जागांवर भाजपचं वर्चस्व आहे.

चंद्रपूरमध्ये मतदानाच्या पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. चंद्रपूरच्या मतदारांनी यावेळी भाजपला कौल दिला की इथे काँग्रेसला पुन्हा एकदा संधी दिली हे मात्र निकालाच्या दिवशीच कळणार आहे.

==========================================================================

VIDEO : पंतप्रधान होणार का? नितीन गडकरींचं मोठं विधान




बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 06:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...