अब्दुल रहमान अंजरिया यांचा लक्ष्मण मानेंवर 35 कोटींचा मानहानीचा दावा

अब्दुल रहमान अंजरिया यांचा लक्ष्मण मानेंवर 35 कोटींचा मानहानीचा दावा

वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांच्यावर अब्दुल रहमान अंजरिया यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 23 जुलै: वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांच्यावर अब्दुल रहमान अंजरिया यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे. लक्ष्मण माने यांनी आपल्यावर खोटे आणि तथ्यहीन आरोप केल्याचा दावा करत अंजरिया यांनी माने यांच्यावर 35 कोटींचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी माने यांनी पत्रकार परिषद घेऊन माफी अशी मागणी त्यांनी केली आहे.

अंजरिया हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. त्यांनी भाजपमध्ये काम केले होते असा आरोप काही दिवसांपूर्वी लक्ष्मण माने यांनी केला होता. अंजरिया यांनी वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती यावर देखील माने यांनी आक्षेप घेतला होता. यासंदर्भात माने यांनी केलेले आरोप खोटे आणि तथ्यहीन असल्याचा दावा अंजरिया यांच्या वकिलांनी केला आहे. तसेच माने यांच्यावर 35 कोटींचा दावा देखील दाखल केला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर माने यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. वंचित बहुजन आघाडी आता वंचितांचा पक्ष राहिला नसून त्यात भाजप आणि संघाचे लोक घुसल्याचा आरोप माने यांनी पडळकरांवर आरोप करताना केला होता. त्यानंतर माने यांनी अंजरिया यांच्यावर जोरदार टीका केली होती.

VIDEO: मराठा आरक्षण...आंदोलक सरकारवर नाराज; घेतला 'हा' मोठा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 23, 2019 03:29 PM IST

ताज्या बातम्या