'आम्ही केवळ टाकी नव्हे तर त्यात पाणीही देणार'

शिवसेना केवळ पाण्याच्या टाकी देणार नाही तर त्यात पाणीही देणार, असे भावनिक आवाहन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2019 12:40 PM IST

'आम्ही केवळ टाकी नव्हे तर त्यात पाणीही देणार'

सोलापूर, 12 फेब्रुवारी: शिवसेना केवळ पाण्याच्या टाकी देणार नाही तर त्यात पाणीही देणार, असे भावनिक आवाहन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. आदित्य ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी लातूर जिल्ह्यातील काही तालुक्यांना भेट दिली होती. त्यानंतर आज त्यांनी मोहोळ तालुक्यातील सारोळ गावातील शेतकऱ्यांची भेट घेतली.

तुम्ही कोणत्याही पक्षाचे मतदार असला तरी शिवसेनेला एक हाक द्या, आम्ही तुमच्या मदतीला धावून येऊ. मी येथे मतांसाठी आलेलो नाही. शिवसेना म्हणजे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण, त्यामुळे आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत, असे देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी सारोळे गावात शिवसेनेच्यावतीने पाण्याची टाकी आणि पशुखाद्य वाटप केले.

शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे

शेतकरी हा आमचा पोशिंदा आहे. त्यामुळे कर्जमाफी नाही तर संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे, असे आदित्य ठाकरे यानी लातूर येथे सांगितले होते. काल त्यांनी लातूर जिल्ह्यातील चलबुर्गा, बुधोडा, नारंगवाडी, समुद्राळ, जेवळी या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली.


Loading...

हे देखील वाचा:

'निवडणुकीनंतर मंदिराचे बघू म्हणजे काय बघणार?'

पुढील पंतप्रधान शिवसेना ठरवणार- संजय राऊत

अमित शहांचा 'मातोश्री'वर फोन; युतीसाठी उद्धव ठाकरेंनी घातली 'ही' अट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 12:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...