'आधार'ची माहिती '500' रूपयात विक्रीला

त्यामुळे आता लोकांची गोपनीय माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार काय पाउलं उचलतं आणि या आरोपांची सत्यता तपासतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Jan 4, 2018 09:57 PM IST

'आधार'ची माहिती '500' रूपयात विक्रीला

  04 जानेवारी-  एकीकडे  आधार कार्डवरची माहिती सुरक्षित आणि गोपनीय असल्याचा दावा सरकार करत असताना एका रिपोर्टमध्ये आधार कार्डची माहिती फक्त 500 रूपयात विकली जात असल्याचा धक्कादायक खुलासा  ट्रिब्यून वृत्तपत्राने केला आहे.

ट्रिब्यून या इंग्लिश वर्तमानपत्राच्या एका   रिपोर्टरने आधार कार्डची कुणाचीही पर्सनल  माहिती मिळवून देणाऱ्या एका माणसाशी संपर्क साधला. त्या माणसाने या रिपोर्टरला 500 रूपये मागितले. ते 500 रूपये या रिपोर्टरने पेटिएममधून ट्रान्सफर केले. त्यानंतर त्याने  एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिला ज्याच्या साहाय्याने हव्या त्या माणसाच्या आधार कार्डची माहिती पाहता येईल असा दावा  या न्यूजपेपरने केला आहे.

गोष्ट इथेच संपत नाही. तर यापुढे त्या संबंधित माणसाला अजून 300 रूपये दिल्यावर हेच आधार कार्ड पूर्णपणे प्रिंट करून देणारं  सोफ्टवेअरही त्याने रिपोर्टरला पुरवलं. यावरून तुमचा नाव गाव पत्ता यासह कुठलीच माहिती आधार कार्डवर सुरक्षित नाही असा धडधडीत दावाच केला गेला आहे. या सगळ्या रॅकेटमध्ये तब्बल एक लाख लोक गुंतले असल्याची माहिती देखील मिळते आहे.

नोव्हेंबरमध्ये सरकारने  आधार कार्डवरची माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला होता. त्यानंतर बॅंक अकाउंट्स  आधारला जोडणे अनिवार्य करण्यात  आले. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रश्न विचारला असता ते यूआयएडीएने हे आरोप   नाकारले आहेत.  वैयक्तिक  गोपनीयता हा मुलभूत अधिकार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यामुळे आता लोकांची गोपनीय माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार काय पाउलं उचलतं आणि या आरोपांची सत्यता तपासतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 4, 2018 09:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...