कल्याणमध्ये हुक्का पार्लरमध्ये तरूणाची हत्या

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 17, 2017 01:35 PM IST

कल्याणमध्ये हुक्का पार्लरमध्ये तरूणाची हत्या

कल्याण, 17 डिसेंबर: कल्याणमध्ये हुक्का पार्लरमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे.कल्याण पूर्वेतल्या श्रीकृष्ण नगरमधील ही घटना

आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

तरूणाच्या हत्येनंतर जमावानं हुक्का पार्लर जाळला. रियाज शब्बीर शेख असं मयत तरूणाचं नाव आहे. या तरूणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हुक्का पार्लरमध्ये आधी कुठल्यातरी विषयावरून हाणामरी करण्यात आली. त्यानंतर त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान नंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.

सध्या तरी पोलीस याप्रकरणी तपास करून आरोपींचा शोध घेत आहेत.कल्याण गेल्या काही दिवसात हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी एका हॉस्पिटलमधील वादावरून एका  पत्रकारालाही बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2017 01:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...