मोबाईल चोरल्याच्या संशयावरून तरूणाला पेट्रोल ओतून पेटवलं

मोबाईल चोरल्याच्या संशयावरून तरूणाला पेट्रोल ओतून पेटवलं

अंगुली शिंदे असं पीडित तरूणाचं नाव आहे. या तरुणाला सागर नवले आणि बाळू नवले या 2 तरुणांनी दारूच्या नशेत कपडे काढून अमानुष मारहाण केली. केवळ मारहाण करून आरोपी थांबले नाहीत तर त्यांनी अंगुलीवर पेट्रोल टाकून त्याला पेटवले

  • Share this:

21 डिसेंबर: पुणे जिल्ह्यातील~शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसीमध्ये मोबाईल चोरल्याच्या संशयावरून पेटवण्यात आलं आहे. याप्रकरणी आरोपींनी अटक झाली असून यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

अंगुली शिंदे असं पीडित तरूणाचं नाव आहे. या तरुणाला सागर नवले आणि बाळू नवले या 2 तरुणांनी दारूच्या नशेत कपडे काढून अमानुष मारहाण केली. केवळ मारहाण करून आरोपी थांबले नाहीत तर त्यांनी अंगुलीवर पेट्रोल टाकून त्याला पेटवले. रात्री उशिरा हा प्रकार घडला. अंगुलीच्या मदतीला कुणी आलं नाही ,दुसऱ्या दिवशी अंगुलीला आधी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि मग पुण्यात ससूनला हलवलं गेलं.

दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून 5 दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे.अंगुलीच्या वडिलांनी हा प्रकार जातीयवादातून झाल्याचा आरोप केलाय. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर आरोपींवर अट्रोसिटीचा~ गुन्हाही दाखल झालाय. अंगुलीची तब्येत हळू हळू सुधारते आहे

नेहमी गजबजलेल्या आणि वर्दळ असलेल्या परिसरात घडलेल्या या घटनेने औद्योगिक वसाहतीजवळच्या या प्रकरणाने भीतीचे वातावरण निर्माण केलं आहे. रांजणगाव पोलिसांनी घटना घडल्यानंतर काही वेळातच आरोपींना अटक केली आहे.

कामानिमित्त उर्वरित महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने अल्पशिक्षित तरुण पुणे जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरात येतात मात्र अशा क्षुल्लक कारणावरून जर जीव गमावण्याची वेळ या तरुणावर येत असेल तर मोठ दुर्भाग्य म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2017 01:10 PM IST

ताज्या बातम्या