S M L

जळगावमध्ये आज राज्यव्यापी शेतकरी परिषद

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला रास्त भाव आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची संपूर्ण अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी सरकारला अंतिम इशारा देण्यासाठी शेतक-यांची ही परिषद घेतली जाते आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 26, 2017 10:28 AM IST

जळगावमध्ये आज राज्यव्यापी  शेतकरी परिषद

जळगाव,26 सप्टेंबर: जळगावमध्ये आज शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीनं आयोजित केलेली शेतकरी परीषद होते आहे. सरकारला अंतिम इशारा देण्यासाठी शेतकरी परिषद घेण्याचा निर्णय सुकाणू समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला होता.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला रास्त भाव आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची संपूर्ण अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी सरकारला अंतिम इशारा देण्यासाठी शेतकऱ्यांची ही परिषद घेतली जाते आहे. कर्जमुक्ती आणि हमीभावासाठीचा लढा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सुकाणू समितीचं म्हणणं आहे. सरकार,ऑनलाईनचा घोळ घालत आणि अटी शर्ती लादत लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवतंय असा आरोप या समितीनं केलाय. शेतीमालाला रास्त भाव आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यास सरकार तयार नाही. उलट दडपशाही करून आंदोलन कमकुवत करण्याचे अयशस्वी प्रयत्न सरकार करत आहे. अशा पार्श्वभूमीवर सरकारला अंतिम इशारा देऊन सरकारला मागण्या मान्य करायला ही परिषद भाग पाडेल असा इशारा सुकाणू समितीनं दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 26, 2017 10:27 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close