एसटी कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनात एकाचा हार्ट अॅटॅकने मृत्यू

एसटी कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनात एकाचा हार्ट अॅटॅकने मृत्यू

एकनाथ विठ्ठल वाकचोरे असं मयत व्यक्तीचं नाव आहे. वाकचोरेंचं वय 50 वर्ष होतं. आज सकाळी अकोले बस स्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन चालू असताना वाकचोरे उपस्थित होते

  • Share this:

अकोले, 18 ऑक्टोबर: 7वा वेतन आयोग लागू व्हावा म्हणून ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असतानाच एका एसटी कर्मचाऱ्याचा संपादरम्यान मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्हयातील अकोले गावात ही घटना घडली असून या घटनेनंतर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

एकनाथ विठ्ठल वाकचोरे असं मयत व्यक्तीचं नाव आहे. वाकचोरेंचं वय 50 वर्ष होतं. आज सकाळी अकोले बस स्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन चालू असताना वाकचोरे उपस्थित होते. तेव्हा त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं निधन झालं.

तर दुसरीकडे प्रवाशांचे या संपामुळे प्रचंड हाल होत आहेत. एसटी कर्मचारी आणि एसटी प्रशासन यांची दुसरी बैठक निष्फळ ठरली आहे. पण प्रश्न असा आहे की दिवाळीपर्यंत हा संप चिघळूच का दिला. एसटी कर्मचाऱ्यांनी याबाबत वारंवार इशारे दिले होते. तेव्हा परिवहन मंत्री दिवाकर रावते काय करत होते, आणि आताही ते काय करत आहेत असा संतप्त सवाल प्रवासी करत आहेत.

राज्यात अनेकांची दिवाळी या संपामुळे खराब झालीय. कालच्या एक दिवसांच्या संपामुळे एसटी महामंडळाला अंदाजे 28 ते 32 कोटींपर्यंत नुकसान झालंय. तेव्हा आता तरी सरकार हा प्रश्न सोडवतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2017 04:18 PM IST

ताज्या बातम्या