Elec-widget

राज ठाकरेंच्या संकल्पनेतून मुठा नदीपात्रात स्मार्ट प्रकल्प, अशी आहे 'ब्लू प्रिंट'

राज ठाकरेंच्या संकल्पनेतून मुठा नदीपात्रात स्मार्ट प्रकल्प, अशी आहे 'ब्लू प्रिंट'

नाशिकमध्ये गोदापार्क प्रकल्प राबवणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील मुठा नदीच्या पात्रात 840 कोटींच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प राबवण्याचा मानस व्यक्त केलाय.

  • Share this:

अद्वैत मेहता, पुणे

22 आॅगस्ट : गुजरातमध्ये साबरमती रिव्हर प्रोजेक्ट पाहून नाशिकमध्ये गोदापार्क प्रकल्प राबवणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील मुठा नदीच्या पात्रात 840 कोटींच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प राबवण्याचा मानस व्यक्त केलाय.

विशेष म्हणजे प्रकल्प उभारणी करता उद्योगपती तयार असल्याचं सांगत याकरता जाणकार पुणेकरांचा समावेश असलेला ट्रस्ट स्थापन करण्याची कल्पना त्यांनी मांडली आहे.

राज ठाकरे यांनी आज पालकमंत्री गिरीश बापट,महापौर मुक्ता टिळक,पुणे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या समोर बालगंधर्व रंगमंदिर ते म्हात्रे पुला दरम्यान काय काय करता येईल याचं दृकश्राव्य सादरीकरण केलं.

राज यांच्या कल्पनेनुसार मुठा नदीत नौकानयन, नदीपात्रात फुलराणी रेल्वे,नदीच्या दोन्ही तटावर बागा वसवता येतील. जेणेकरून पुणेकरांना त्यांच्या कच्च्या बच्च्यांसह फिरायला बागडायला मिळेल.

Loading...

याशिवाय बालगंधर्व रंगमंदिर परिसरात मल्टिप्लेक्स सिनेमा गृहाच्या धर्तीवर मल्टिप्लेक्स नाट्यगृह बांधता येतील

1000 प्रेक्षक क्षमतेची 2 नाट्यगृहे, 3000 क्षमतेचे 1 ओपन एअर नाट्यगृह आणि 100-200 जागांचे प्रायोगिक नाट्यकर्मींसाठी नाट्यगृह असं स्वरूप याचं असेल.

340 खाजगी उद्योजकांनी प्रत्येकी 25 लाख निधी दिला तर मुठा नदी सुधार प्रकल्प साकारता येईल. हे स्पष्ट करून मनसे किंवा राज ठाकरे ला श्रेय नको किंबहुना यात पुणेकरांचा सहभाग असावा असं मत राज ठाकरे यांनी मांडलं. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं महापौर टिळक म्हणाल्या.

पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीला गटार गंगेची अवकळा आलीये. नदीत थेट सांडपाणी सोडलं जातंय. जलपर्णी,कचरा, घाण ,केमिकलने मुठेचं पाणी काळवंडलंय. असह्य दुर्गंधी पसरली आहे. यापूर्वी नदीसुधार प्रकल्प घोषणा झाल्या पण काही घडलं नाही

दुसरीकडे नदीपात्रात पाईपलाईन टाकायची असो, रस्ता काढायचा असो किंवा मेट्रो मार्ग पुण्यातले जागरूकपर्यावरण प्रेमी कार्यकर्ते कोर्टात, हरित लवादाकडे धाव घेतात त्यामुळे पर्यावरण हा मुद्दाही महत्वाचा ठरतो.

जपानच्या जायका कंपनी सोबतही नदी शुद्धीकरणाकरता 990 कोटींचा करार प्रकाश जावडेकर केंद्रीय पर्यावरण मंत्री असताना झालाय. पण पुण्यात कोणताही प्रकल्प सहजासहजी होत नाही

अनेक अडथळे पार करून प्रकल्प पूर्ण व्हायला अनेक वर्षे लागतात

त्यामुळे हे प्रत्यक्ष होईपर्यंत नदीपात्रात राज ठाकरे यांच्या विक्रमी गर्दीच्या किती सभा होतात हे पहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2017 07:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...