येरवडा कारागृहात कैद्याची ठेचून हत्या

सुरेश महापूरकर हा कैदी जागीच ठार झालाय. मुळचा अहमदनगरचा असलेला हा कैदी ३६३ च्या गुन्ह्यात चार वर्षाची शिक्षा भोगत होता.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2017 12:52 PM IST

येरवडा कारागृहात कैद्याची ठेचून हत्या

पुणे, 8 जुलै : पुण्यातील येरवडा कारागृहात एका कैद्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आलीय. त्यात सुरेश महापूरकर हा कैदी जागीच ठार झालाय. मुळचा अहमदनगरचा असलेला हा कैदी ३६३ च्या गुन्ह्यात चार वर्षाची शिक्षा भोगत होता.

येरवडा कारागृहातील दिनेश नावाच्या कैद्यानेच त्याचा डोक्यात दगड घालून खून केलाय. कारागृहातील वैमनस्यामुळे ही हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येतय. या हत्येमुळे येरवडा कारागृहातील कैद्यांमध्ये एकच खळबळ उडालीय. मुंबईतील भायखळा जेलमधील मंजुळा शेट्येचं मृत्यू प्रकरण ताजं असतानाच येरवडा कारागृहातही एका कैद्याची ठेचून हत्या झाल्याने तुरुगांमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेला आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2017 12:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...