ठाण्यात महिला पोलीस कॉन्स्टेबलची गळफास लावून आत्महत्या

सारिका पवार असं या महिला पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. सारिका ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयात कार्यरत होती. ती मूळची अहमदनगरची रहिवाशी आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 7, 2017 08:48 AM IST

ठाण्यात महिला पोलीस कॉन्स्टेबलची गळफास लावून आत्महत्या

ठाणे, 07 सप्टेंबर: ठाणे पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या आणि कळवा येथील मनीषा नगरात राहणाऱ्या 21 वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या प्रकरणी कळवा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सारिका पवार असं या महिला पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. सारिका ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयात कार्यरत होती. ती मूळची अहमदनगरची रहिवाशी आहे. वर्षभरापूर्वीच ठाणे पोलीस ती दलात भरती झाली होती. कळव्यातील मनीषा नगरात सारिका आपल्या तीन मैत्रिणींसोबत भाड्याच्या रूममध्ये राहत होती.

दरम्यान सारिका बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास आपल्या रूममध्ये एकटी असताना तिने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी कळवा पोलिसांनी सारिकाचा मृतदेह शिवाजी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. सारिकाच्या आत्महत्येचं कारण अजून कळलेलं नसून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती कळवा पोलीसांनी  दिली आहे. तर याबाबत नातेवाईकांची चौकशी करणार असल्याचंही पोलिसांनी संगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2017 08:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...