मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर प्रवाशाला मारहाण करून लुटलं

किवळे गावानजीक पंकज कदम यांना गाडीतल्याच चोरांनी मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल, पैसे हिसकावून घेतले आणि त्यांना रस्त्यावरच फेकून दिलं.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2017 12:00 PM IST

मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर प्रवाशाला मारहाण करून लुटलं

पिंपरी,08 जुलै : मुंबई - पुणे 'एक्सप्रेस वे'वरती खासगी वाहनातून चक्क प्रवाशालाच मारहाण करून लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

काल रात्री किवळे गावानजीक पंकज कदम यांना गाडीतल्याच चोरांनी मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल, पैसे हिसकावून घेतले आणि त्यांना रस्त्यावरच फेकून दिलं. त्यात ते गंभीर जखमी झालेत. काल रात्री ते वाकडच्या हिंजवडी पुलाखालून मुंबईकडे येण्यासाठी एका खासगी पॅसेंजर गाडीत बसले होते. एका खासगी स्कॉर्पिओ गाडीतून ते मुंबईला निघाले होते पण रस्त्यामध्येच गाडीतल्याच चोरट्यांनीच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केलाय. जखमीवर पिंपरीत उपचार सुरू आहेत. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे मुंबई-पुणे असा प्रवास करणाऱ्यांना नक्कीच मोठा धक्का बसलाय

मुंबई-पुणे एक्सप्रेसवरून दररोज अनेक खासगी वाहने पोलिसांच्या आशिवार्दाने प्रवासी वाहतूक करतात, प्रवासाचा वेळ थोडाफार कमी होत असल्यानं लोक देखील अशा खासगी वाहनांमधून शेअरिंग पद्धतीनं प्रवास करतात. मुंबई-पुणे असा नियमित प्रवास करणाऱ्या काही जणांच्या तर आता हे अंगवळणी पडलंय. पण अशातच पॅसेंजरच्या वाहतुकीच्या नावाखाली प्रवाशालाच लुटल्याचा हा गंभीर प्रकार समोर आलाय. त्यामुळे खासगी प्रवाशांनी यापुढे जरा सावधानता बाळगूनच प्रवास करण्याची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2017 10:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...