पुण्यात इन्क्युबेटरच्या स्फोटाने एका नवजात अर्भकाचा भाजून मृत्यू

पुण्यात इन्क्युबेटरच्या स्फोटाने एका नवजात अर्भकाचा भाजून मृत्यू

बाळाला श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यास इन्क्‍युबेटरमध्ये ठेवण्यात आले. काही वेळानंतर इन्क्‍युबेटरने अचानक पेट घेतला

  • Share this:

पुणे,28 सप्टेंबर: पुण्यातील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये इन्क्युबेटरने पेट घेतल्यामुळे झालेल्या स्फोटात एका नवजात अर्भकाचा मृत्यू झालाय. डॉ. आणि रूग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इन्क्यूबेटरने अचानक पेट घेतल्यामुळं अर्भक गंभीररित्या भाजल्याची धक्कादायक घटना घडलीय.

अप्पा बळवंत चौकातील वात्सल्य रुग्णालयामध्ये हा प्रकार घडला. स्वाती कदम यांना सोमवारी रात्री प्रसूतीवेदना झाल्यामुळे तांबडी जोगेश्‍वरी मंदिरासमोरील वात्सल्य रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. तपासणीनंतर सकाळी प्रसूती करू, असे डॉक्‍टरांनी कुटुंबीयांना सांगितले. त्यानुसार सकाळी पावणे आठ वाजता स्वाती यांचे सीझर करण्यात आले. त्यानंतर पावणे नऊ वाजता बाळाला श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यास इन्क्‍युबेटरमध्ये ठेवण्यात आले. काही वेळानंतर इन्क्‍युबेटरने अचानक पेट घेतला. त्यावेळी स्वाती यांच्याजवळ असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरडा करून हा प्रकार तत्काळ डॉक्‍टरांच्या निदर्शनास आणून दिला. डॉक्‍टरांनी अर्भक इन्क्‍युबेटरमधून बाहेर काढले. तत्पूर्वी ते गंभीररीत्या भाजले होते. त्यामुळे डॉक्‍टरांनी तत्काळ दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलविले. मात्र अर्भकाची प्रकृती गंभीर असल्याने नातेवाईकांनी तत्काळ घटनेची माहिती विश्रामबाग पोलिसांना दिली. नंतर या अर्भकाचा मृत्यू झाला

यावर वडीलांनी केलेल्या तक्रारीप्रकरणी या डॉक्टर गौरव चोपडेसह तीन जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटूंबियांकडून करण्यात येते आहे.या प्रकरणामुळे कदम कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2017 11:18 AM IST

ताज्या बातम्या