News18 Lokmat

लग्नाच्या पूर्वसंध्येलाच तरुणीची आत्महत्या

मंगळवारी रात्री पिंपरी-चिंचवडच्या विद्यानगर झोपडपट्टीतील ही घटना आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सीमा सकाटे(22) असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे.तिचं साताऱ्यातील एका मुलाशी लग्न होणार होतं.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 13, 2017 12:45 PM IST

लग्नाच्या पूर्वसंध्येलाच तरुणीची आत्महत्या

13 डिसेंबर: लग्नाच्या पूर्वसंध्येला पिंपरी चिंचवडमध्ये एका तरूणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ माजली आहे.

मंगळवारी रात्री पिंपरी-चिंचवडच्या विद्यानगर झोपडपट्टीतील ही घटना आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सीमा सकाटे(22) असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे.तिचं साताऱ्यातील एका मुलाशी लग्न होणार होतं.

. लग्नाच्या काही तासांपूर्वी वधूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लग्न काही तासांवर आलं असल्याने घरात धामधूम होती. वधू पित्याची पत्रिका वाटपाची आणि राहिलेली कामं उरकण्याची धावपळ सुरू होती. या सगळ्या गडबडीतच तिने स्वत:चे आयुष्य संपवलं.

पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 13, 2017 12:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...