नागपूरमध्ये तरूणीचा दगडाने ठेचून खून

नागपूरमध्ये तरूणीचा दगडाने ठेचून खून

नागपूरच्या अजनी पोलिस स्टेशनच्या हद्दीत मेडिकल कॉलेज आहे. या कॉलेजच्या हॉस्पिटलच्या परिसरातील होस्टेल नंबर सात जवळच्या झाडाझुडपात तरूणीचा मृतदेह आज सकाळी सापडला आहे.

  • Share this:

नागपूर,07 ऑक्टोबर: नागपूरमध्ये अजनी परिसरात तरूणीचा दगडाने ठेचून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

नागपूरच्या अजनी पोलिस स्टेशनच्या हद्दीत मेडिकल कॉलेज आहे. या कॉलेजच्या हॉस्पिटलच्या परिसरातील होस्टेल नंबर सात जवळच्या झाडाझुडपात तरूणीचा मृतदेह आज सकाळी सापडला आहे. या 25 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची उघडकीस आली आहे. या महिलेवर बलात्कार करून खून करण्यात आला असावा असं प्रथमदर्शनी पोलिसांच्या तपासात कळतंय. या घटनेनंतर पुन्हा एकदा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी डीन कार्यालयाला घेराव करून आंदोलन केले. जर मेडिकल काॅलेज मध्ये एका महिलेचा खून होऊ शकतो तर इतर मुलींच्या सुरक्षेचं काय असा सवालही विद्यार्थानींनी उपस्थित केला आहे

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2017 12:04 PM IST

ताज्या बातम्या