S M L

गृहपाठ केला नाही म्हणून दिली 500 उठाबशांची शिक्षा!

कोल्हापूर जिल्ह्यातील कानूर गावात ही घटना घडली आहे. या गावातील भावेश्वरी शाळेत संबंधित विद्यार्थिनी आठवीत शिकते आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 13, 2017 10:11 AM IST

गृहपाठ केला नाही म्हणून दिली 500 उठाबशांची शिक्षा!

कोल्हापूर, 13 डिसेंबर: गृहपाठ केला नाही म्हणून एका विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यातच 300 उठाबशा काढून ही विद्यार्थिनी कोसळली असून सध्या तिच्यावर कोल्हापुरात उपचार सुरू आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील कानूर गावात ही घटना घडली आहे. या गावातील भावेश्वरी शाळेत संबंधित विद्यार्थिनी आठवीत शिकते आहे. तिने गृहपाठ केला नव्हता. या कारणासठी शाळेच्या शिक्षिका अश्विनी देवाण यांनी तिला 500 उठबशा काढण्याची शिक्षा सुनावली. 300 उठबशा काढल्यावर मुलगी कोसळली. तिला तात्काळ रूग्णालयात भरती करण्यात आलं आहे. सध्या तिच्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान देवाण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी अजूनही या शिक्षिकेवर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 13, 2017 10:11 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close