...असा ही एक लग्नसोहळा

संगमनेरमध्ये सामाजिक बांधिलकी जोपासणारा असा एक अनोखा लग्न सोहळा खरोखरच पार पडलाय.या लग्नात कृषिदिनही साजरा केला गेला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2017 09:57 AM IST

...असा ही एक लग्नसोहळा

2 जुलै  : लग्न म्हंटलं की,वरात जेवण, फटाके,मानपान या सगळ्या गोष्टी आल्याच .पण आजची किती लग्नं ही सामाजिक बांधिलकी जोपासतात? किती लग्नांमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी काहीतरी केलं जातं? पण संगमनेरमध्ये सामाजिक बांधिलकी जोपासणारा असा एक अनोखा लग्न सोहळा खरोखरच पार पडलाय.या लग्नात कृषीदिनही साजरा केला गेला.

संगमनेरमध्ये तालुक्यातील अर्जुन काशीद यांच्या मुलीचा विवाह तालुक्यातीलच सातपुते यांच्या मुलाबरोबर संपन्न झाला.कृषीदिनाच्या मुहूर्तावर हा सोहळा पार पडला. मात्र कृषीदिन आणि सामाजिक बांधिलकीचं भान राखत काशीद व सातपुते कुटुंबीयांनी लग्नात पार पाडणाऱ्या सत्कार सोहळ्याला महत्त्व न देता झाडं लावा व झाडं जगवा हा संदेश रुजविण्याचा निश्चय केला. या संकल्पनेला साथ देत नववधू-वर दोघांनीही सप्तपदीचे फेरे घेण्यापूर्वी वृक्षारोपण करून आपल्या नवजीवनाची सुरवात केलीय.

नववधू-वर हे दोघं फक्त वृक्षारोपण करून थांबले नाहीत तर लग्नाला आलेल्या सर्व व-हाडी मंडळीनाही रत्नागिरी हापूस आंब्याच्या एक हजार रोपांच वाटप करून त्यांनी ख-या अर्थानं कृषीदिन साजरा केला असं वधूचे पिता अर्जुन काशीद यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2017 09:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...