S M L

जन्मल्यानंतर फक्त 6 मिनिटात मिळाले आधार कार्ड

अवघ्या ६ मिनिटातच आधार कार्ड मिळवण्याचा विक्रम भावना जाधव ह्या नवजात बालिकेनं केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या मोहिमे अंतर्गत हा नवीन विक्रम झालाय.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 25, 2017 10:37 AM IST

जन्मल्यानंतर फक्त 6 मिनिटात मिळाले आधार कार्ड

उस्मानाबाद,25 सप्टेंबर: उस्मानाबाद जिल्ह्यातील महिला रुग्णालयात अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. जन्मल्यानंतर अवघ्या ६ मिनिटातच आधार कार्ड मिळवण्याचा विक्रम भावना जाधव ह्या नवजात बालिकेनं केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या मोहिमे अंतर्गत हा नवीन विक्रम झालाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजीटल इंडिया या योजनेअंतर्गत गेल्या १ वर्षापासून उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात जन्मतः आधार व लहान बालकांचा जन्मोत्सव हे उपक्रम राबवले जात आहेत. त्यातून १३०० बालकांना आधार क्रमांक मिळाला आहे . मात्र जन्म घेऊन अवघ्या 6 मिनिटात भावनाला आधार कार्ड व जन्म दाखला देऊन आपल्या कर्तबगरची नवा झेंडा उस्मानाबाद स्त्री रुग्णालयाने रोवला आहे. इतक्या कमी काळात आधार कार्ड मिळवणारी भावनाही पहिली भारतीय नागरिक ठरली आहे.

यापूर्वी मध्यप्रदेश राज्यातील झाबुवा येथील राखी या मुलीला जन्म झाल्यानंतर २२ मिनिटात आधार कार्ड मिळाले होते. मात्र हे रेकॉर्ड उस्मानाबाद स्त्री रुग्णालयात जन्म घेतलेल्या भावनाने मोडले आहे . उस्मानाबाद स्त्री रुग्णालयातील जिल्हाधिकारी स्त्री रुग्णालयातीळ सर्जन ,व शल्यचिकीत्सक यांनी भावनाचा जन्म होताच तिचे स्वागत केले व तिला आधार कार्ड देऊन तिच्या जन्म दाखल्या ची नोंद करण्यात आल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2017 10:37 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close