पाणी भरताना पाय घसरल्याने विहिरीत पडून 70 वर्षीय महिलेचा मृत्यू

मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असल्याने पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेलेली एक ७० वर्षीय महिला पाय घसरून विहिरीत पडल्याची दुर्दैवी घटना जळगावमध्ये घडली आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 3, 2018 01:51 PM IST

पाणी भरताना पाय घसरल्याने विहिरीत पडून 70 वर्षीय महिलेचा मृत्यू

03 मे : मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असल्याने पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेलेली एक ७० वर्षीय महिला पाय घसरून विहिरीत पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये महिलेच्या डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघात असलेल्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात घडली आहे.

जामनेर, बोदवड, पारोळा यांसारख्या काही भागात पिण्यासाठीदेखील पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे. अशाच स्थितीत जामनेर तालुकयातील शेंगोळा या गावातील नर्मदा आनंदा आढाव या वृद्ध महिला गावातील इतर महिलांसोबत सार्वजनिक विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या असता पाय घसरून त्या विहिरीत पडल्या.

विहिरीत पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटना घडताच गावातील ग्रामस्थांनी विहिरीवर गर्दी केली. मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबात कोणीही नसुन त्या एकट्याच राहत असल्याची माहिती सुत्रांकडून सांगण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2018 01:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...