नागपूरच्या प्रसिद्ध क्रेझी कॅसल वॉटर पार्कमध्ये बुडून 2 तरूणांचा मृत्यू

सध्या उन्हाळा सुरू आहे आणि सुट्ट्यांनिमित्त शहरातल्या लोकांची पावलं वॉटर पार्ककडे तर गावातल्या रहिवाशांची पावलं नदी-तलावाकडे वळतात. मात्र ...

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 20, 2018 05:37 PM IST

नागपूरच्या प्रसिद्ध क्रेझी कॅसल वॉटर पार्कमध्ये बुडून 2 तरूणांचा मृत्यू

20 मे : सध्या उन्हाळा सुरू आहे आणि सुट्ट्यांनिमित्त शहरातल्या लोकांची पावलं वॉटर पार्ककडे तर गावातल्या रहिवाशांची पावलं नदी-तलावाकडे वळतात. मात्र पोहता येत नसले तर पाण्यात उतरण्याचं धाडस दाखवू नका. कारण नागपूरच्या अंबाझरी परिसरातल्या हल्दीराम कंपनीच्या प्रसिद्ध क्रेझी कॅसल वॉटर पार्कमध्ये दोन तरूणांचा बुडून मृत्यू झाला आहे. सागर सहस्त्रबुद्धे आणि अक्षय बिंड असं मृत्यू झालेल्या तरूणांची नावं असून त्यांचं वय 18च्या घरात असल्याची माहिती मिळतेय.

वॉटर पार्कमधल्या व्हेव नावाच्या वॉटर राइडजवळ दहा ते पंधरा जणांचा ग्रूप खेळत होता. अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यामुळं तीन जण बुडाले. तिघांनाही जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान दोघांना मृत घोषित करण्यात आलं. तर एकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

क्रेझी कॅसल वॉटर पार्कचं प्रशासन संभाळणाऱ्या हल्दीराम इंटरनॅशनच्या हलगर्जीपणामुळं ही दुर्घटना घडली आहे का या अनुषंगानं पोलीस तपास करत आहेत. पण असे जीवघेणे प्रकार थांबवता येऊ शकतात. अशा हलगर्जीपणामुळे नाहक बळी जाण्यापेक्षा आपण जर आपली जास्त काळजी घेतली आणि नेहमी सतर्क राहुन काम केलं तर आपल्या मनोरंजनामध्ये असे जीवघेणे अडथळे येणार नाही.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2018 05:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...