चंद्रपुरात 9 महिन्यांच्या तान्हुल्याचे बिबट्याने तोडले लचके

बिबट्याच्या हल्ल्यात 9 महिन्यांच्या तान्हुल्याचा मृत्यू झाला आहे. स्वराज सचिन गुरनुले असे तान्हुल्याचे नाव आहे. सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात ही घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 2, 2019 12:43 PM IST

चंद्रपुरात 9 महिन्यांच्या तान्हुल्याचे बिबट्याने तोडले लचके

हैदर शेख (प्रतिनिधी)

चंद्रपूर, 2 जून- बिबट्याच्या हल्ल्यात 9 महिन्यांच्या तान्हुल्याचा मृत्यू झाला आहे. स्वराज सचिन गुरनुले असे तान्हुल्याचे नाव आहे. सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात ही घटना घडली आहे. अंगणात खाटेवर झोपलेल्या तान्हुल्याला बिबट्या पळविले. आरडाओरड आणि शोधाशोध केल्यानंतर तान्हुल्याचा मृतदेह सापडला आहे. वनपथक दाखल झाले आहेत. या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेली माहिती अशी की, सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात अंगणात खाटेवर झोपलेल्या तान्हुल्याला रात्री उशिरा बिबट्याने पळविले. अंगणाच्या पडवीत बाळासह झोपलेली आई पाणी पिण्यासाठी घरात गेल्यावर बिबट्याने हा हल्ला केला. आरडाओरड आणि शोधाशोध झाल्यावर सकाळी गावालगत चिमुकल्याचा मृतदेह सापडला. वनपथक आणि पोलीस गावात दाखल झाले आहेत. मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयात ठेवून ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या गावात प्रचंड तणावाची स्थिती आहे.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील संघारामगिरी येथे काही दिवसांपूर्वी ध्यानस्थ बसलेल्या बौद्ध भिक्‍खूवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यात बौद्ध भिक्‍खूचा मृत्यू झाला होता. एक महिना आधी ब्रम्हपुरी तालुक्यात असलेल्या पोवनपार येथे बिबट्याने हल्ला करून एका महिलेला ठार केले होते.

बिबट्याचा दुचाकीवर हल्ला; महिला गंभीर जखमी

Loading...

पेमगिरी व नांदुरी शिवालगत डाळिंबाच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला. सुदेशना यांच्या डाव्या पायावर बिबट्याने जोराचा पंजा मारल्याने त्या जखमी झाल्या.

शिरुरमध्ये बिबट्याची दहशत..घोड्याचे तोडले लचके...

गणेशनगरमध्ये मेंढपाळ नाथा कऱ्हे यांच्या मालकीच्या घोड्याचे बिबट्याने लचके तोडले. या हल्ल्यात त्यांचा घोडा ठार झाला असून नाथा कऱ्हे यांचे 45 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.


VIDEO: धक्कादायक! जळत्या चितेत उडी मारुन तरुणाची आत्महत्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 2, 2019 12:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...