समृद्धी हायवेला ऐंशी टक्के शेतकऱ्यांचा पाठिंबा- मुख्यमंत्री

समृद्धी हायवेला ऐंशी टक्के शेतकऱ्यांचा पाठिंबा- मुख्यमंत्री

सातशे किलोमीटरपैकी 670 किलोमीटर मार्गाची मोजणी झालीये. त्यामुळे समृद्धी हायवे होणारच असा निर्वाळाही त्यांनी दिलाय.

  • Share this:

28 मे : समृद्धी हायवेतील प्रकल्पग्रस्त ऐंशी टक्के शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. सातशे किलोमीटरपैकी 670 किलोमीटर मार्गाची मोजणी झालीये. त्यामुळे समृद्धी हायवे होणारच असा निर्वाळाही त्यांनी दिलाय.

ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यांच्याशी सरकार चर्चा करणार असल्याचंही ते म्हणाले. नाशिकमध्ये ते बोलत होते. संपावर जाणाऱ्या शेतकऱ्यांशीही सरकार चर्चा करीत असून शेतकऱ्यांनी संपावर जाऊ नये असं आवाहनही त्यांनी केलंय.

भारतातील सर्वात मोठा प्रकल्प समृद्धी महामार्ग प्रकल्पाची संपूर्ण आखणी पूर्ण झाली असून आराखडा तयार आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून संपूर्ण मार्गाचे काम एकाचवेळी सुरू करण्यात येईल. या महामार्गाला नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे (समृद्धी महामार्ग) असं नाव देण्यात आलं आहे. ३१ जुलै २०१५ रोजी या प्रकल्पाची घोषणा सभागृहात करण्यात आली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2017 06:23 PM IST

ताज्या बातम्या