नागपुरात शाळेजवळ वीज कोसळली.. 8 विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

गुरुवारी आसोली परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या दरम्यान शाळेच्या परिसरात वीज कोसळली.

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 05:47 PM IST

नागपुरात शाळेजवळ वीज कोसळली.. 8 विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

नागपूर, 28 जून- रामटेक तालुक्यातील आसोली इथल्या जिल्हा परिषद शाळेजवळ वीज कोसळून आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी आसोली परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या दरम्यान शाळेच्या परिसरात वीज कोसळली. शाळेच्या छताचे आणि इमारतीचे प्लास्टर पडल्याने काही विद्यार्थी जखमी झाले. वीज कोसळल्याने शाळेच्या भिंतींना तडे पडले आहेत. तसेच विद्युत वायर तुटल्या. बल्पही फुटले आहेत.

नयन कडबे आणि तेजु दूरबुडे हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांवर जिल्हा आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. इतर सहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.

मुंबईत पहिल्या पावसाने घेतला तिघांचा बळी

Loading...

मुंबईसह उपनगरात गुरुवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पहिल्याच पावसाने तिघांचा बळी घेतला आहे. अंधेरी परिसरातील 60 वर्षीय महिलेसह गोरेगाव परिसरातील दोघांचा मृतांमध्ये समावेश आहे. शॉक लागून या तिघांचा मृत्यू

झाल्याची माहिती मिळाली आहे. काशिमा युडीयार (वय-60, रा. अंधेरी), राजेंद्र यादव (वय-60), संजय यादव (वय-24, दोघेही रा. गोरेगाव पूर्व) अशी मृतांची नावे आहेत. तर शॉक लागून दोघे जखमी झाले आहेत.

दादरमध्ये भिंत पडून 3 जखमी..

दादरमध्ये अंगावर भिंत पडून 3 जण जखमी झाले आहेत.दिनकर तोडवले (वय-35), विजय नागर (वय-35) व चेतन ताठे (वय-28)

अशी जखमींची नावे आहे. जखमींना केईम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, मुंबईसह राज्यभर पावसाची वाट पाहिली जात असताना मध्यरात्रीपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने जोरदीर हजेरी लावली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, कोकण या भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. शिवाय, देशाच्या अन्य राज्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिसा, झारखंड आणि बिहारमध्ये 2 जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन हे काही दिवस लांबलं. अद्याप मान्सून सर्व देशात देखील सक्रीय झालेला नाही. पण, राज्यात मात्र मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात मान्सून उशिराने दाखल होण्यास वायू चक्रीवादळ देखील कारणीभूत ठरले आहे. पुढील 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

SPECIAL REPORT : नाशिकमध्ये आषाढीनिमित्त निघालेल्या सायकल वारीला लागबोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2019 05:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...