मध्य रेल्वेच्या 72 रेल्वे स्टेशन्सला मिळणार सरकते जिने

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर आपल्या सोयीसुविधांमध्ये सुधारणा करण्यास रेल्वेने सुरूवात केली आहे. मुंबईतील 3 स्टेशन्सवर पूल बनवल्यनंतर आता रेल्वेने जिन्यांचं काम हाती घेतलंय

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2017 12:35 PM IST

मध्य रेल्वेच्या 72 रेल्वे स्टेशन्सला मिळणार सरकते जिने

07 नोव्हेंबर: एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन आता वेगानं कामाला लागल्याचं दिसतंय. पूलाच्या दुरूस्तीला वेग आल्यासोबतच मध्य रेल्वेच्या 72 रेल्वे स्टेशन्सवरती सरकते जिने उभारण्याचा रेल्वेचा प्रस्ताव आहे.

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर आपल्या सोयीसुविधांमध्ये सुधारणा करण्यास रेल्वेने सुरूवात केली आहे. मुंबईतील 3 स्टेशन्सवर पूल बनवल्यनंतर आता रेल्वेने जिन्यांचं काम हाती घेतलंय. 72 स्टेशन्सवर सरकते जिने बनवणार आहेत. त्यापैकी 30 सरकते जिने हे यावर्षी 31 डिसेंबरपर्यंत बांधून पूर्ण होतील असा विश्वास रेल्वे प्रशासनानं व्यक्त केलाय. या सरकत्या जिन्यांचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत सरकते जिने हे केवळ ब्रिजवर वरती चढण्यासाठी होते आता रेल्वे प्रशासन ब्रिजवरुन उतरण्यासाठीही सरकते जिने बांधणार आहे . त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तरी गर्दीच्या वेळेला प्रवाशांची येण्याजाण्यासाठी होणारी कोंडी हे सरकते जिने कितपत सोडवतील हा प्रश्न आहेच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2017 12:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...