S M L

नागपुरात वेणा धरणात बोट बुडाली;आठ जणांचा मृत्यू

बोटीत क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच अकरा जण बसले होते त्यामुळेच तोल जाऊन हा अपघात झाला.

Sonali Deshpande | Updated On: Jul 10, 2017 04:27 PM IST

नागपुरात वेणा धरणात बोट बुडाली;आठ जणांचा मृत्यू

10जुलै: नागपूर जिल्ह्यातल्या धामण्यातील वेणा जलाशयात बोट उलटून आठ युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त असे अकरा जण बसले होते त्यामुळेच तोल जाऊन हा अपघात झाला.

ही बोट बुडाल्यानंतर तीन जण पोहत बाहेर आले तर एक मृतदेह तलावाच्या काठावर आढळलाय.  नागपूरच्या न्यू सुभेदार ले आऊट परिसरात राहणाऱ्या राहुल जाधव नावाच्या युवकाचा मृतदेह असल्याची ओळख पटलीय. तर अतुल बावने, रोशन दोडके, अमोल दोडके असे बचावलेल्या तिघांची नावं आहेत.

मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संध्याकाळच्या सुमाराला हे तरुण वेणा डॅममध्ये गेले होते. बोट लहान असूनही त्यात  नावाड्यासह एकूण अकरा जण बसले होते. आणि बोटीत त्यांची दंगामस्ती सुरू होती. बोटीत बसून हे तरुण फेसबुक लाईव्ह करत होते. यापैकी बहुतांश जणांना पोहायला येत नव्हतं, हे एक तरुणच फेसबुक लाईव्हमध्ये सांगताना ऐकायला मिळतंय. ही दंगामस्ती सुरू असताना बोट कलंडली. अकराही जण पाण्यात पडले. त्यापैकी दोन नावाड्यांसह तीन जण पोहून बाहेर आले. बाकीचे पाण्यात बुडाले.

दरम्यान सिंचन विभागाच्या वेणा जलाशयात बोटिंग करण्याची परवानगीच नसताना या ठिकाणी अवैध बोटिंग होत असल्याची धक्कादायक माहिती पुढं आली आहे.

Loading...

दरम्यान सकाळपासून मोठ्या प्रमाणावर शोधकार्य सुरु आहे . या ठिकाणी परवानगी नसताना मासेमारी आणि बोटिंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2017 09:05 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close