गडचिरोलीतील नवीन जोडणी रस्त्यास 601 लक्ष निधी केला मंजूर

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील नागेपल्ली व एटापल्ली या दोन गावांना जोडणारा रस्ता व पुलाचे बांधकामाने दोन गावांमधील अंतर कमी होणार असल्याने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून नवीन जोडणीअंतर्गत या रस्त्यांना 601 लक्ष निधी मंजूर केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2019 07:52 PM IST

गडचिरोलीतील नवीन जोडणी रस्त्यास 601 लक्ष निधी केला मंजूर

मुंबई, 11 जून- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील नागेपल्ली व एटापल्ली या दोन गावांना जोडणारा रस्ता व पुलाचे बांधकामाने दोन गावांमधील अंतर कमी होणार असल्याने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून नवीन जोडणीअंतर्गत या रस्त्यांना 601 लक्ष निधी मंजूर केला आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, सन 2018-19 या वर्षाकरीता घोषित केलेल्या दरसुची नुसार एकूण 1.50 कि.मी. लांबीच्या रस्त्याची व या रस्त्यावरील 70 मी लांबीच्या पुलाची एकूण रक्कम 601.72 लक्ष व पंचवार्षिक देखभाल दुरूस्ती रक्कम 13.23 लक्ष इतक्या खर्चाला पंकजा मुंडे यांनी मंगळवारी मंजुरी दिली आहे. या रस्त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दळणवळण सुकर होणार असून अंतरही कमी होणार आहे. त्याचबरोबर वाहनांना इंधनही कमी लागणार आहे. शेतकऱ्यांना वेळेत शेतीमाल बाजारपेठेत घेवून जाण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण रस्ते राज्याच्या आर्थिक, सामाजिक विकासासाकरीता एक महत्त्वाचा घटक असुन राज्यातील ग्रामीण जनतेला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याकरीता एक महत्वाचे साधन आहे. ग्रामिण रस्त्याकरीता भारत सरकारने महत्वकांक्षी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना राबविली आहे. याच पार्श्वभुमीवर राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्याचा धोरनात्मक निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे ग्रामीन भगाचा चेहरा मोहरा बदलत आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत राज्यातील पर्यावरण विषयक प्रश्न तसेच रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात निरोपयोगी प्लास्टीकचा वापर केल्याने रस्त्याच्या टिकावूपणामध्ये होणारी वाढ या बाबी विचारात घेवून या योजनांतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात निरूपयोगी प्लास्टीकचा वापर करण्याबाबतचे धोरणही ठरविले असल्याचे त्यांनी यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितले.


Loading...

VIDEO : जमीन हडपली का? धनंजय मुंडेंची UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2019 07:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...