S M L

दिव्यांग वृद्धाचा आगीत होरपळून मृत्यू, मृतदेहाचा झाला कोळसा

ल पेटली असतांना त्याची ठिणगी गादीवर पडल्याने आग भडकली. हरिदास हे दिव्यांग असल्याने आग लागल्याचे लक्षात येवूनही त्यांना हातपाय हलवता आले नाही. अशातच त्यांचा मृत्यू झाला.

संजय शेंडे संजय शेंडे | Updated On: Apr 21, 2019 03:35 PM IST

दिव्यांग वृद्धाचा आगीत होरपळून मृत्यू, मृतदेहाचा झाला कोळसा

अमरावती, २१ एप्रिल- तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे एका ६० वर्षीय दिव्यांग वृद्धाचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. हरिदास बालाजी वाघमारे (वय-६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, हरिदास वाघमारे हे अनेक वर्षांपासून आजारी होते. ते खाटेला खिळून होते. अचानक लागलेल्या आगीत हरिदास यांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजता घडली. चूल पेटली असतांना त्याची ठिणगी गादीवर पडल्याने आग भडकली. हरिदास हे दिव्यांग असल्याने आग लागल्याचे लक्षात येवूनही त्यांना हातपाय हलवता आले नाही. अशातच त्यांचा मृत्यू झाला.

ही घटना घडली तेव्हा हरिदास यांची पत्नी शेतात गेली होती. नागरिकांना घरातून धूर येतांना दिसला, मात्र तोपर्यंत हरिदास यांचा कोळसा झाला होता.   हरिदास अत्यंत हलाखीची परिस्थितीत जीवन जगत होते. त्यांच्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 03:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close