हिंगोलीजवळ खासगी बस-ट्रकचा भीषण अपघात, 6 जागीच ठार

हिंगोलीजवळ खासगी बस-ट्रकचा भीषण अपघात, 6 जागीच ठार

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जण जागीच ठार झालेत

  • Share this:

02 एप्रिल :  हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जण जागीच ठार झाले असून सात प्रवासी गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही सामावेश आहे. आज (रविवारी) सकाळी हा दुर्दैवी अपघात झाला आहे.

कळमनुरीजवळील पारडी मोडववर रविवारी सकाळी लक्झरी बस आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. यातील 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर नांदेड आणि हिंगोलीतील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.  ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2017 11:41 AM IST

ताज्या बातम्या