मेंढ्यांच्या कळापावर पडली विद्युत वाहिनी, 55 मेंढ्या जागेवरच दगावल्या

मेंढ्यांच्या कळापावर पडली विद्युत वाहिनी, 55 मेंढ्या जागेवरच दगावल्या

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात कडुस येथे मेंढ्यांच्या कळापावर विद्युत वाहिनीची तार तुटून पडून 55 मेंढ्या जागेवर दगावल्या.

  • Share this:

रायचंद शिंदे, (प्रतिनिधी)

खेड, 24 जून- पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात कडुस येथे मेंढ्यांच्या कळापावर विद्युत वाहिनीची तार तुटून पडून 55 मेंढ्या जागेवर दगावल्या. तालुक्यातील कडूस-टोकेवाडी येथील आवटे मळ्यात विद्युत वहिनीची तार तुटून मेंढ्यांच्या कळपावर पडल्याची धक्कादायक घटना रविवारी (23 जून) सायंकाळच्या सुमारास घडली. दैव बलवत्तर म्हणून यामध्ये मेंढपाळ कुटुंब थोडक्यात बचावले.

विजेच्या धक्क्यामुळे शिवाजी नाथा तिखोळे व बाळू नाथा तिखोळे (रा.ढवळपुरी, जि.नगर) या मेंढपाळ भावांच्या 55 मेंढ्या जागेवरच मरण पावल्या. घटनास्थळी मृत मेंढ्यांचा अक्षरशः ढीग लागलेला आहे.

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

दुसऱ्या घटनेत खान्देशात वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली आहे. भुसावळ तालुक्यात सव्वा तास भुसावळात मुसळधार पाऊस झाला.जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथील युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत युवक हा मध्य प्रदेशातील रहिवासी आहे.

पंढरपुरात बरसल्या पाऊसधारा..

पंढरपुरमध्ये पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे. पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली होती. पाऊस आज दिवसभर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

परभणी जिल्ह्यात पावसाची हजेरी..

परभणी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिलासा मिळाला आहे. काही भागात रिमझिम सुरु आहे तर सेलू , मानवत परिसरात जोरदार पाऊस आहे.

भिवंडीत नागरिकांची तारांबळ

शहरात अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची तारांबळ झाली. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

वर्धा जिल्ह्यात रविवारपासून पाऊस..

वर्धा जिल्ह्यात रविवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी साधारण पाऊस आहे. अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे.

VIDEO: विदर्भ, मराठवाड्यात मान्सूनची एन्ट्री, मुंबईकडे फिरवली पाठ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2019 09:29 AM IST

ताज्या बातम्या