धक्कादायक! 5 कुत्र्यांचा 1 चिमुरड्यावर क्रूर हल्ला

5 भटक्या कुत्र्यांनी एका चिमुरड्याला अनेक चावे घेतले आहेत. त्यामुळे चिमुरड्याला संपूर्ण शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2019 10:58 PM IST

धक्कादायक! 5 कुत्र्यांचा 1 चिमुरड्यावर क्रूर हल्ला

नाशिक, 12 एप्रिल : नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांनी सामूहिक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. 5 भटक्या कुत्र्यांनी एका चिमुरड्याला अनेक चावे घेतले आहेत. त्यामुळे चिमुरड्याला संपूर्ण शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबल उडाली आहे.

नाशिक अंबड लिंक रोडवरील घाटोळ मळा परिसरात कुत्र्यांच्या वावर जास्त आहे. अवघ्या दीड वर्षाच्या मुलावर 5 कुत्र्यांनी हल्ला केला. त्याला गंभीर इजा झाली आहे. घटना समजताच त्याला तात्काळ नजिकच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

दारात खेळणाऱ्या लहान मुलावर कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. बाळाने ओरडण्यास सुरुवात केली. त्यानंतर बाळाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवण्यात आलं. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

फर्निचरच्या शोरूमला लागली आग, कुत्र्याने वाचवला 35 जणांचा जीव, पण...

उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यामध्ये अतर्रा गावात बर रस्त्यात असलेल्या एका बहुमजली इमारतीतील फर्निचर शोरूमला गुरुवारी मध्यरात्री आग लागली. शॉक सर्किट झाल्यामुळे इमारतीत आगीने पेट घेतला. ही आग इतकी भीषण होती की यामध्ये तब्बल 5 कोटींचं सामान जळून खाक झालं.

Loading...

जागा छोटी असल्याने वेगाने इमारतीमध्ये आग पसरली. त्यात सिलेंडरचा स्फोट झाल्य़ामुळे शेजारी असलेली 4 दुकानंही यामध्ये उद्ध्वस्त झाली. यात सगळ्यात विशेष म्हणजे इमारतीमध्ये पाळलेल्या एका कुत्र्यांने तब्बल 35 लोकांचा जीव वाचवला आहे. आग लागल्याचं समजताच त्यांना भूंकण्यास सुरुवात केली. त्याच्या या सतर्कतेमुळे इमारतीतील 35 लोकांचे प्राण वाचले खरे पण यात त्याचा मात्र मृत्यू झाला.

फर्निचर शोरुमचे मालक राकेश चौरसिया यांनी सांगितलं की, गुरुवारी रात्री अचानक शॉक सर्किट झाला. तेव्हा सगळेच लोक झोपले होते. आग लागल्यानंतर माझ्या पाळलेल्य़ा कुत्र्याने भूंकण्यास सुरुवात केली. ज्यामुळे सगळ्या लोकांची झोप उडाली. त्यामुळे 35 लोक वेळीच घरा बाहेर आले आणि त्यांचा जीव वाचला. पण रस्सीने तो स्वत: बांधलेला असल्यामुळे त्याचा यात मृत्यू झाला.

त्यांनी पुढे सांगितलं की, 'या आगीची तीव्रता वाढत असतानाच घरातील एका सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे शेजारची इतर दुकानं आगीत भस्मसात झाली.' त्यांनी सांगितल्यानुसार, या आगीमध्ये तब्बल 5 कोटींचं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर या फर्निचर शोरुम मालकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.


...आणि कांचन कुल यांना आमदारसाहेबांनी घेतलं उचलून, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 10:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...