मांढरदेवीच्या पाच भाविकांना विषबाधा ?

मांढरदेवीच्या पाच भाविकांना विषबाधा ?

या पाचही जणांना एका भोंदूबाबाने कुठलंतरी औषध दिल्याच सांगितलं जातंय.

  • Share this:

सातारा, 27 जुलै :बारामतीहून मांढरदेवी गडावर आलेल्या एकाच कुटूंबातील पाच जणांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर सातारा जिल्हा रुग्णायात उपचार सुरू असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.

तृप्ती विष्णू चव्हाण (१६), प्रतीक्षा चव्हाण (२२), सुनिता विष्णू चव्हाण (४८),मुक्ताबाई नारायण चव्हाण (५८)आणि ड्रायव्हर भिमसेन जाधव (ड्रायव्हर) ही रुग्णांची नावं आहेत. तर स्वप्नील चव्हाण या तरूणाचा वाटेतच मृत्यू झाला आहे.

या पाचही जणांना एका भोंदूबाबाने कुठलंतरी औषध दिल्याच सांगितलं जातंय. त्या औषधामुळेच कुटुंबीयांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्याचा आरोप होतोय. सातारा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2017 01:46 PM IST

ताज्या बातम्या