आयसीयू आणि व्हेंटीलेटर नसल्यानेच नाशकात 347 नवजात बालकांचा मृत्यू

आयसीयू आणि व्हेंटीलेटर नसल्यानेच नाशकात 347 नवजात बालकांचा मृत्यू

या रुग्णालयातील विशेष नवजात शिशू दक्षता विभागात सुरूवातीपासूनच नवजात बालकांसाठी व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नाही. मुळात 18 वॉर्मर ठेवण्याची या रूगणालयाची. क्षमता आहे. या 18 वॉर्मर मशीन्समध्ये 57 बालकांवर उपचार केले जात आहेत

  • Share this:

नाशिक,08 सप्टेंबर: उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील शासकीय रुग्णालयात शेकडो अर्भकांचे बळी गेल्याचे प्रकरण ताजे असताना नाशकातील जिल्हा रुग्णालयात वर्षभरात 347 बालकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पण  आयसीयू आणि व्हेंटीलेटर नसल्यानेच मुलांचा मृत्यू झाल्याची नाशिकच्या डॉक्टरांनी कबुली दिली आहे.

या रुग्णालयातील विशेष नवजात शिशू दक्षता विभागात सुरूवातीपासूनच नवजात बालकांसाठी व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नाही. मुळात 18 वॉर्मर ठेवण्याची या रूगणालयाची. क्षमता आहे. या 18 वॉर्मर मशीन्समध्ये 57 बालकांवर उपचार केले जात आहेत. नाईलाजाने एक वॉर्मर पेटीत 3 बालकांना ठेवण्याची वेळ डॉक्टरांवर आली होती. तसंच या नवजात बालकांच्या कक्षात 25 बालकांच्यामागे एक नर्स काम करत आहे तर डॉक्टरांची संख्यादेखील कमी आहे.हॉस्पीटलमध्ये बराच स्टाफही नाही

इथे मृत झालेल्या बालकांचा रेशो सरासरी 10 ते 30 टक्के इतका आहे. या नवजात बालकांसाठी नवीन कक्ष तयार करण्यासाठी शासनाने 22 कोटींची मंजुरी मिळाली आहे. पण या कामासाठी महानगरपालिका सहकार्य करत नसल्याचं सिव्हिल सर्जनचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2017 11:24 AM IST

ताज्या बातम्या