S M L

कर्जमाफीसाठी आलेले तीस लाख अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता-किशोर तिवारी

तब्बल 1 कोटी सहा लाख अर्ज कर्जमाफीसाठी करण्यात आले आहेत. यापैकी जवळजवळ ६६ लाखांच्या जवळ शेतकरी कुटुंब आहेत आणि तब्बल ३० लाख नामधारी शेतकरी आहेत अशी माहिती समोर आली आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 25, 2017 02:09 PM IST

कर्जमाफीसाठी आलेले तीस लाख अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता-किशोर तिवारी

25 सप्टेंबर: जूनच्या महिन्यात कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे महाराष्ट्रात आंदोलन झाले.त्यानंतर कर्जमाफीसाठी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू करण्यात आली . या योजनेअंतर्गत अर्ज भरणारे तब्बल 30 लाख शेतकरी नामधारी असण्याची धक्कादायक बाब समोर येते आहे.

वसंतराव नाईक  स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष असणाऱ्या किशोर तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजने अंतर्गत तब्बल 1 कोटी सहा लाख अर्ज कर्जमाफीसाठी करण्यात आले आहेत. यापैकी जवळजवळ ६६ लाखांच्या जवळ शेतकरी कुटुंब आहेत आणि तब्बल ३० लाख नामधारी शेतकरी आहेत अशी माहिती समोर आली आहे. या 30 लाख शेतकऱ्यांते अर्ज बाद होऊ शकतात  अशी माहिती आयबीएन लोकमतला मिळाली आहे. महाराष्ट्रातील गावांमध्ये सरासरी ३० टक्के शेतकरी भाडेपट्टीने शेती करतात त्यांचे अर्जही बाद होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2017 10:23 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close