खामगावात भरदिवसा तरुणीची निर्घृण हत्या, प्रियकराने केला आत्महत्येचा प्रयत्न

खामगाव शहरातील संजिवनी कॉलनीत एका 27 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे. ह

News18 Lokmat | Updated On: May 17, 2019 11:47 PM IST

खामगावात भरदिवसा तरुणीची निर्घृण हत्या, प्रियकराने केला आत्महत्येचा प्रयत्न

अमोल गावंडे, (प्रतिनिधी)

बुलडाणा, 17 मे- खामगाव शहरातील संजिवनी कॉलनीत एका 27 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे. हत्या झालेल्या मृतक तरुणीचे नाव अश्विनी सुधीर निंबोकार असे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आणि आरोपीचा शोध घेतला असता अश्विनीची हत्या तिच्या प्रियकराने केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता त्यानेही शेगाव येथे रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या करणायचा प्रयत्न केला. त्याला अकोला येथ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मृत अश्विनी निंबोकार ही खामगाव शहरातील सनी पॅलेस भागात राहत होती. अश्विनी आणि आरोपी सागर निंबोळे यांचे मागील 4 ते 5 वर्षांपासून प्रेमप्रकरण होते. एकाच समाजातील असल्याने त्यामुळे दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी लग्न ठरविले होते. मात्र मुलाचे वडील हुंडा जास्त मागत असल्याने दोघांला लग्नाला अडथळा निर्माण झाला होता. मात्र, दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतलेलय होत्या. अशातच आज अश्विनीचा मुक्त विद्यापीठाचा पेपर होता. दुपारी पेपर झाल्यावर दोघांची घटनस्थळावर भेट झाली. मात्र दोघांत काहीतरी वाद झाला आणि आरोपी सागरने तिच्या अंगावर सलूनच्या वस्तऱ्याने सपासप वार केले. तिच्या डोळ्यात स्क्रू ड्रायव्हरने वॉर केले. त्यामुळे अश्विनी जागीच मरण पावली. आरोपी गटनस्थळावरून पसार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता शेगाव रेल्वे स्थानकावर आरोपीने रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

आरोपीने अश्विनीच्या चेहऱ्यावर आणि पोटावर सपासप वार करून तिला जखमी केले. अति रक्तस्त्राव झाल्याने तिचा जागीच  झाला. तर घटनास्थळावर चंगळीच  झटापट झाली असावी, असा अंदाज ही पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळावर अश्विनीची पर्स, सलून वस्तरा, घड्याळ मिळाले. अश्विनीच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तरुणीच्या हत्या प्रकरणात अजूनही काही मारेकरी आहेत का ? याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.


Loading...

राज्यात पुन्हा धडकणार उष्णतेची लाट, पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2019 11:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...