26/11सारख्या हल्ल्याचा कट पुन्हा शिजत असल्याची शक्यता,तटरक्षक दलाच्या सूत्रांची माहिती

काही दिवसांपूर्वी समुद्रात मच्छीमारांच्या बोटवर हल्ला झाला, त्यांचा फोन आणि बायोमेट्रिक कार्ड हिसकवून घेण्यात आलं, अशी माहिती मिळतेय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 26, 2017 01:45 PM IST

26/11सारख्या हल्ल्याचा कट पुन्हा शिजत असल्याची शक्यता,तटरक्षक दलाच्या सूत्रांची माहिती

आशिष सिंह, 26 नोव्हेंबर : 26/11च्या हल्ल्याला ९ वर्षं पूर्ण झाली पण महाराष्ट्राचा किनारा आजही सुरक्षित नाहीये, असंच म्हणावं लागेल. काही दिवसांपूर्वी समुद्रात मच्छीमारांच्या बोटवर हल्ला झाला, त्यांचा फोन आणि बायोमेट्रिक कार्ड हिसकवून घेण्यात आलं, अशी माहिती मिळतेय.

महाराष्ट्राचा समुद्र किनारा आजही सुरक्षित नाहीये. एका मोठ्या दहशतवादी कटाची तयारी सुरू आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांमधल्या सूत्रांकडून मिळाली आहे.  काही दिवसांपूर्वी मच्छिमारांच्या एका होडीवर हल्ला झाला, आणि मच्छिमारांकडचा मोबाईल फोन आणि त्यांचं बायोमेट्रिक कार्ड हिसकवून घेण्यात आलं. तटरक्षक दलाच्या intelligence sharing बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली.

अजून हल्ला झाला नाही म्हणजे भविष्यातही होणार नाही, असं नाहीये.कारण जो फोन आणि बायोमेट्रिक कार्ड हिसकवून घेण्यात आलं, त्याचा गैरवापर होऊ शकतो. नकली बायोमेट्रिक कार्ड बनवून सुरक्षा यंत्रणांना चकवा दिला जाऊ शकतो. किंवा हल्ला करायच्या आधी त्या मोबाईलवरून फोन केले जाऊ शकतात. नंबर भारतीय असल्यानं गुप्तचर यंत्रणांची नजर चुकवली जाऊ शकते.

या सगळ्यामुळे मच्छिमारांना एकट्यानं मासेमारीला जाऊ नये, अनेक मच्छिमारांनी समूह बनवून मासेमारी करावी, अशी सूचना सुरक्षा यंत्रणांनी केलीये. मच्छिमारांनी कोणत्याही संशयित हालचालींकडे लक्ष ठेवावं, असंही त्यांना सांगण्यात आलं. किनाऱ्यांवरची गस्तही वाढवण्यात आलीये. 26/11सारखा हल्ला पुन्हा होऊ नये, आणि त्यासाठी सरकारनं सर्व खबरदारी बाळगावी, एवढीच अपेक्षा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2017 12:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...