विरारमध्ये बिअरशॉपवर आलेल्या 26 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

विरारमध्ये (पूर्वे) फुलपाडा रोड जनकपूर धाम येथील आयजोशी बिअर शॉपबाहेर दारू पिण्याच्या वादातून एका 26 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2019 07:13 PM IST

विरारमध्ये बिअरशॉपवर आलेल्या 26 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई, 12 जुलै- विरारमध्ये (पूर्वे) फुलपाडा रोड जनकपूर धाम येथील आयजोशी बिअर शॉपबाहेर दारू पिण्याच्या वादातून एका 26 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या करून मारेकरी फरार झाले आहेत. केतन मंडल असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, बिअर शॉपवर बिअर पिताना अमित तोमर या नावाच्या तरुणासोबत केतनची बाचाबाची झाली. त्यानंतर याचे रूपांतर हाणामारीत झाले. मारामारीत केतन याच्या तोंडाला जबर मार लागल्याने तो जागीच बेशुद्ध झाला. त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद केला असून आरोपीचा शोध घेत आहेत.

फुलपाड्यातील या बिअर शॉपवर अनेकवेळा हाणामारीचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे रहिवाशी वस्तीतील हे बिअर शॉप कायमचे बंद करावे, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत. विरार पोलिसांनी आरोपी अमित तोमरला ताब्यात घेऊन पुढील तपास करत आहेत

कोण होता केतन?

केतन हा इंडिया बुल्स कंपनीमध्ये काम करत होता. रात्री आठच्या सुमारास तो आयजोशी बिअर शॉपवर बिअर पिण्यासाठी गेला होता. तिथे असलेल्या अमित तोमरसोबत शुल्लक कारणावरून त्याची बाचाबाची झाली. यादरम्यान हा प्रकार घडला.

Loading...

दरम्यान, विरारला (पूर्व) या बिअर शॉपचा मालक शॉप परिसरातच बिअर पिण्यासाठी जागा देत असल्याने मोठ्या संख्येने मद्यपी येथे येतात. अनेकेवळा येथे हाणामारीचे प्रकार घडल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या जाणाऱ्यांना असुरक्षितता वाटत असल्याने हे बिअरशॉप कायमचे बंद करावे, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.

VIDEO : धावत्या रेल्वेत चढू नका, पाहा या महिलेसोबत काय घडलं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2019 07:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...