नगरसेवकाच्या घरात इंजिनियरिंचा पेपर सोडवणारे 26 विद्यार्थी ताब्यात

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 17, 2017 03:56 PM IST

नगरसेवकाच्या घरात इंजिनियरिंचा पेपर सोडवणारे 26 विद्यार्थी ताब्यात

17 मे : औरंगाबादमध्ये एका नगरसेवकाच्या घरात इंजिनियरिंच्या परीक्षेचा पेपर सोडवणाऱ्या 26 विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच तिथे उपस्थित असणाऱ्या महाविद्यालयाचे संस्थाचालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.

साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगचा बी. ई. सिव्हिल  द्वितीय वर्षाचा सिव्हिल कन्स्ट्रक्शन अँड ड्रॉईंग या विषयाचा पेपर मंगळवारी झाला. मात्र, तेव्हा विद्यार्थ्यांनी फक्त एकाच प्रश्नाचे उत्तर दिले आणि उर्वरित उत्तरपत्रिका कोरी ठेवली. त्यानंतर शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरात हे सर्व विद्यार्थी पेपर लिहिताना सापडले. त्यानंतर या सर्वांना पोलिसांना ताब्यात घेतलं.

गुन्हे शाखेनं ही कारवाई केली असूनया प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत. पण या घटनेमुळे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग परीक्षेतील गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2017 03:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...