25 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, 5 वर्षांपूर्वी झालं होतं लग्न!

मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ येथे 25 वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पल्लवी आशिष महल्ले असं मृत महिलेचे नाव आहे.

News18 Lokmat | Updated On: May 3, 2019 01:20 PM IST

25 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, 5 वर्षांपूर्वी झालं होतं लग्न!

किशोर गोमाशे (प्रतिनिधी)

वाशिम, 3 मे- मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ येथे 25 वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पल्लवी आशिष महल्ले असं मृत महिलेचे नाव आहे. 2 मे रोजी दुपारी 4 च्या सुमारास पल्लवीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

समोर आलं हे कारण...

पल्लवीचे 5 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तिला 4 वर्षांचा एक मुलगा आहे. अशात तिला दुर्धर आजार जडला होता. या आजाराला कंटाळून पल्लवीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी मंगरुळपीर पोलिसांत आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

घरची परिस्थिती जेमतेम..

Loading...

पल्लवीच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. पल्लवीच्या आजारावर कुटुंबीयांनी लाखो खर्च केले, परंतु ती बरी झाली नाही. त्यात घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. कुटुंब खर्च करुन हतबल झालं होतं. याबाबत पल्लवीला जाणीव होती. त्यामुळे, तिने टोकाचे पाऊल उचलल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे. पल्लवीच्या पश्चात पती, सासू, सासरे आणि एक मुलगा आहे.


VIDEO: मुंबईच्या रस्त्यावर धावली 'द बर्निंग बस'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2019 01:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...