धुळ्यात 24 शेतकऱ्यांनी केला सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

अनेर धरणाच्या पाण्यापासून वंचित असल्याने शेती धोक्यात आलेल्या मांजरोद येथील 24 शेतकऱ्यांनी शिरपूर पाटबंधारे उपविभागाच्या गलथान कारभाराला कंटाळून सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला.

News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2019 02:55 PM IST

धुळ्यात 24 शेतकऱ्यांनी केला सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

दीपक बोरसे, (प्रतिनिधी)

धुळे, 12 जून- अनेर धरणाच्या पाण्यापासून वंचित असल्याने शेती धोक्यात आलेल्या मांजरोद येथील 24 शेतकऱ्यांनी शिरपूर पाटबंधारे उपविभागाच्या गलथान कारभाराला कंटाळून सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या शेतकऱ्यांचे जीव बचावले असले तरी संतप्त शेतकऱ्यांनी यानंतर रास्ता रोको आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊनही पाटबंधारे विभाग दाद देत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. अनेर मध्यम प्रकल्पाच्या पाटचारीत पाटबंधारे उपविभागातर्फे पाणी अडविले आहे. पाण्यापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पाणीपुरवठा करा अन्यथा सामूहिक आत्मदहनाची परवानगी द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली होती. दरम्यान, निवेदन देऊनही कोणतीच दखल घेण्यात येत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आत्मदाहणाचा प्रयत्न केला.

विधानसभा काबीज करण्यासाठी पवारांचं 'मिशन कार्यकर्ता', वेळापत्रक समोर

काय आहे नेमकं प्रकरण?

Loading...

अनेर प्रकल्पाच्या चारीचे काम 2004 मध्ये पूर्ण झाले असून यात परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. मात्र, भूसंपादनाचे मोजमाप झालेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना कोणताच मोबदला मिळालेला नाही. मोबदल्याच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदलने केली. मोबदला मिळत नाही तोवर आपल्या क्षेत्रा लगतच्या चारीतून पाणी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली आहे. परिणामी पाटचारीसाठी जमीन देणारे सुमारे 100 शेतकऱ्यासह पाटचारीतील पाण्यावर अवलंबून असलेले 400 शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत.


CycloneVayu: बळीराजाची चिंता वाढणार, मान्सून आणखी लांबणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2019 02:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...